मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक याने मुख्यमंत्री यांचं कौतुक करताना केलेल्या एका वक्तव्यावरून माजी खासदार यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. ‘अनुराग कश्यप याचं वक्तव्य ही सरळ सरळ यांची बदनामी आहे,’ असा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरण व मुंबईबद्दल कंगना राणावत हिनं केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना व कंगना आमनेसामने आले होते. मुंबईत मला असुरक्षित वाटतं असं वक्तव्य तिनं केलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं तिच्याविरोधात आघाडी उघडली होती. त्यास उत्तर देताना कंगनानं मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. सुशांत प्रकरणावरून कंगनानं बॉलिवूडमधील काही कलाकारांनाही लक्ष्य केलं होतं. सुरुवातीला तिच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या काही कलाकारांनी नंतर तिला प्रत्युत्तर दिलं. अभिनेत्री व राज्यसभा खासदार जया बच्चन, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला सुनावलं होतं. दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं कंगनाला अप्रत्यक्ष उत्तर देताना उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. शिवसेनेबद्दलची माझी मतं बदलली आहेत. शिवसेनेबद्दल माझी जी काही मतं होती ती उद्धव ठाकरे यांच्यामुळं बदलली आहेत. मला मुंबईत सुरक्षित वाटतं आणि कुठलीही भीती न बाळगता हवं ते बोलता येतं. महाराष्ट्रात मी आनंदी आहे,’ असं त्यानं म्हटलं आहे.

वाचा:

अनुराग कश्यप याच्या याच वक्तव्याचा धागा पकडून नीलेश राणे यांनी शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेबाबतची मतं बदलली? म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेबाबत अनुराग कश्यपची मतं वेगळी होती? ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे. हे सगळं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निमूटपणे ऐकून घ्यायचं…’ असं ट्वीट नीलेश राणे यांनी केलं आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here