वाचा:
संसदेत रविवारी करोना संक्रमणाबाबत विशेष चर्चा सुरू होती. या चर्चेत भाग घेताना, खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. औरंगाबादेत करमाड येथे मजूर रेल्वेच्या अपघातात मयत झाले. या अपघातासाठी आपण सर्व जण कारणीभूत आहात. या मजुरांना सर्वांनी मरण्यासाठी सोडले होते का? असा सवाल जलील यांनी विचारला. जेव्हा आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला तेव्हा थाळ्या वाजवा, असे सांगण्यात आले. जेव्हा करोना परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा वीज बंद ठेवा, असे संदेश देण्यात आले. फक्त चार तासांच्या अवधीमध्ये संपूर्ण देश बंद करण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असे नमूद करत जलील यांनी केंद्रावर निशाणा साधला.
वाचा:
सध्या देशात एकाही शहरात परिपूर्ण आरोग्य व्यवस्था नाही. अनेक शहरांत व्हेंटिलेटर आणि डॉक्टर्सचा तुटवडा आहे. ज्या शहरात या दोन्ही सुविधा आहेत त्या शहरात रुग्णांसाठी पुरेसे बेड उपलब्ध नाहीत, असे वास्तव खासदार जलील यांनी मांडले. आपण जशी ‘गो करोना गो करोना’ म्हणून हाक दिली होती तशी आता उठ जीडीपी उठ जीडीपी म्हणून हाक देणार आहोत का?, असा खरमरीत सवाल जलील यांनी केला.
करोनालाही धार्मिक रंग दिला!
चीनमध्ये करोना साथीची सुरुवात झाली. नंतर हा रोग इटली, फ्रान्ससह जगभरात पसरला. भारतात हा रोग आल्यानंतर या रोगाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे नमूद करत तबलिघींच्या मुद्द्यावरून जलील यांनी केंद्रावर टीका केली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times