सांगली: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरालगत असलेले रविवारी कोसळले. पावसामुळे मंदिराच्या भिंती कमकुवत बनल्या होत्या, तर भिंतीखालील माती उखडली होती. कळसासह पूर्ण मंदिर संरक्षक भिंत आणि पत्र्याच्या शेडवर पडले. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ( News Updates )

वाचा:

सहा वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून परिसरात सरनोबत मंदिर बांधण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे या मंदिराच्या भिंतींखालील मातीचा भराव उखडला होता. मंदिराच्या भिंती कमकुवत बनल्या होत्या. हे मंदिर रविवारी सकाळी शिखरासह उन्मळून पडले. यात शेजारच्या घराची संरक्षक भिंत आणि पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. पडलेल्या मंदिराचे फोटो काढताना एक तरुण पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here