मुंबई: वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि त्याच्या थप्पड लगावल्याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रिती खोत असे महिलेचे नाव असून, ती विलेपार्ले येथील रहिवासी आहे. सिग्नल तोडल्याने वाहतूक पोलिसाने थांबवले असता, तिच्यासोबत असलेली मुलगी दुचाकीवरून पडली. त्यामुळे तिने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण केली.

खोत ही १७ सप्टेंबर रोजी मुलगी मेघासोबत दुचाकीवरून चालली होती. परळ येथील टीटी जंक्शनवर सिग्नल तोडण्याचा प्रयत्न करत असताना, तिला हरिश उरणकर यांनी थांबवले. दुचाकी चालवत असलेल्या मेघाचा त्यामुळे तोल गेला आणि ती खाली पडली. उरणकर यांनी ते पाहिले. ते तातडीने मदतीसाठी धावले. मात्र, तुमच्यामुळे मुलगी दुचाकीवरून पडल्याचा आरोप करत खोत हिने उरणकर यांना शिवीगाळ करून त्यांच्या कानाखाली मारली.

इतर वाहतूक पोलिसांनी उरणकर आणि खोत यांना भोईवाडा पोलीस ठाण्यात नेले. तिथे खोत हिच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खोत यांना दंड ठोठावला. आम्ही उरणकर यांचा जबाब नोंदवून घेतला असून, खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नोटिस बजावल्यानंतर खोत हिला सोडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here