मुंबई: यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीवर टीका करणाऱ्या शिवसेनेला माजी खासदार यांनी उत्तर दिलं आहे. ‘शिवसेना नेहमी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या पहाटेच्या शपथविधीवर टीका करते. पण पवारसाहेबांचा गेम कोणी केला असेल तर तो अजितदादा पवारांनीच केला,’ असा टोला नीलेश राणे यांनी हाणला आहे.

वाचा:

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारबाबत गौप्यस्फोट करण्यात आला आहे. फडणवीसांचं हे सरकार वाचवण्यासाठी राज्यातील काही अधिकारी राबले होते. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळ्या पद्धतीनं जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानंही याकामी विशेष कामगिरी बजावली. बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते,’ असा आरोप शिवसेनेनं केला आहे. फडणवीसांना ‘पहाटेचे मुख्यमंत्री’ असं म्हणूनही हिणवलं आहे.

वाचा:

शिवसेनेच्या या टीकेला उत्तर देताना नीलेश राणे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. फडणवीसांच्या शपथेवर टीका करता? मग अजितदादा पवार पहाटे-पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय,’ असा प्रश्न राणेंनी केला आहे. ‘अजित पवारांजवळ आमदार टिकले नाहीत म्हणून ते परत गेले. पण पवार साहेबांचा खरा राजकीय गेम तेव्हा कोणी केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला,’ असं म्हणत नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही डिवचलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here