डोंबिवली: वाढदिवसाच्या पार्टीत दारू प्यायल्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत एका २५ वर्षीय करण्यात आली. तसेच अन्य एक जण जखमी झाला आहे. डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. शिवाजी खंडागळे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो संतोष लष्कर याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. तर लष्कर या हाणामारीत जखमी झाला आहे.

महेश गुंजाळ (वय २२), निखिल माने (वय २३), जयेश जुवळे (वय २२), आशिष वाल्मिकी (वय २२) आणि श्रीनिवास सुगला (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील रहिवासी आहेत. शुक्रवारी भल्या पहाटे ही घटना घडली. मुलीचा मामा राजू धोत्रे (वय २९) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. राजू धोत्रे हा देखील बर्थडे पार्टीला उपस्थित होता.

लष्कर यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र गुरुवारी रात्री बर्थडे पार्टीसाठी एकत्र आले होते. या पार्टीत आलेल्यांनी दारू प्यायली होती. रात्रीचे दोन वाजले होते. गुंजाळ याने पाच महिन्यांपूर्वी मला शिवीगाळ केल्याचे लष्कर याने मेहुणा धोत्रेला सांगितले. धोत्रे हा लष्कर आणि खंडागळे यांना घेऊन गुंजाळच्या घरी जाब विचारण्यासाठी गेला. गुंजाळ आणि त्याचे साथीदार आधीच हॉकी स्टिक्स, लोखंडी सळया आणि तलवार घेऊन तयार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजाळसह त्याच्या साथीदारांनी या तिघांवर हल्ला केला. त्याचदरम्यान खंडागळेच्या डोक्यावर लोखंडी सळईचा जोरदार प्रहार झाला. तो जागीच ठार झाला. आम्ही या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here