नागपूर: ‘राज्यातील काही आयपीएस अधिकारी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होते’… या गृहमंत्री यांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झालेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली. ‘असं काही वक्तव्य आपण केलं नसल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय. ते खरं आहे असं समजून त्यांना आपण संशयाचा फायदा देऊ. पण त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ निघणंही बरोबर नाही,’ असा चिमटा फडणवीस यांनी काढला आहे.

केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्याची माहिती देण्यासाठी फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना काही राजकीय प्रश्नही विचारले. ‘राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला गेला. शरद पवारांनी यात हस्तक्षेप केला होता,’ असं वृत्त गृहमंत्री देशमुख यांच्या हवाल्यानं नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. देशमुख यांनी तात्काळ ते फेटाळून लावलं. माझ्या तोंडी हे वक्तव्य टाकून बातमी देण्यात आली, असं त्यांनी म्हटलं होतं.

वाचा:

फडणवीसांना याबाबत विचारलं असता त्यांनी देशमुखांसह ठाकरे सरकारवरही टीका केली. ‘महाराष्ट्रातल्या कुठल्याही गृहमंत्र्यानं आपल्या पोलिसांवर इतका अविश्वास दाखवला नाही. आम्ही सत्तेत आलो तेव्हाही आधीचेच पोलीस होते. आम्ही त्याच पोलिसांना सोबत घेऊन उत्तम काम केलं. सरकार जे सांगतं त्यानुसार पोलिसांना काम करावं लागतं. काही ठिकाणी त्यांना त्यांचे म्हणून विशेष अधिकार आहेत,’ असं फडणवीस म्हणाले. ‘देशमुख यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलंय. त्यांना संशयाचा फायदा देऊ. पण त्यांच्या बोलण्याचा असा काही अर्थ निघणंही बरोबर नाही. स्वत: अविश्वास दाखवायचा आणि दुसऱ्यानं काही म्हटलं की महाराष्ट्राचा अपमान झाला असं म्हणायचं हे योग्य नाही,’ असा टोलाही त्यांनी हाणला.

फोन टॅपिंगचे अधिकार कुठल्याही राजकीय व्यक्तीकडे नसतात!

फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांकडे असलेले अधिकार नव्या सरकारनं गृहमंत्र्यांकडे दिले आहेत असं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. त्याबाबतही फडणवीस यांनी मत मांडले. ‘फोन टॅपिंगच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही नियम आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय व्यक्ती त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मुख्य सचिव व अपर मुख्य सचिवांना हे अधिकार असतात. गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे हे अधिकार नसतात. मुख्यमंत्री त्याचा आढावाही घेऊ शकत नाहीत. एखाद्या अपवादात्मक प्रकरणी सरकारला काही माहिती हवी असेल तर त्यासाठीही परवानगी घ्यावी लागते. आताच्या गृहमंत्र्यांनी तसे अधिकार स्वत:कडे घेतले असतील तर त्यांनी ते घेऊ नयेत,’ असा सल्ला त्यांनी दिला.

‘सामना’त रोज काहीतरी छापून येतं!

फडणवीसांचं पहाटेचं सरकार वाचवण्यासाठी राज्यातील काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते, असा आरोप शिवसेनेनं ‘सामना’तून केला आहे. त्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, ‘सामनात रोज काहीतरी छापून येतं. त्यांचं लिहिण्याचं कामच आहे. त्यावर रिअॅक्शन देण्याची गरज नाही.’

वाचा:

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here