कोल्हापूर: कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे…. गेल्या अनेकदिवसांपासून मटणापासून दूर राहवे लागलेल्या कोल्हापूरकरांच्या ताटात आजपासून मटण येणार आहे. मटण विक्रेते कृती समितीने आजपासून ५२० रुपये प्रति किलो दराने उत्तम प्रतीच्या मटणाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात मटणाच्या दरावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादावर तोडगा निघाल्याने सर्वसामान्य ग्राहक, विक्रेते आणि हॉटेल व्यवसायिक यांना हायसे वाटले आहे.

कोल्हापुरात मटण दरवाढ झाल्यानंतर मटण दरवाढविरोधी कृती समितीन प्रति किलो ४८० रुपये दराने मटणाची विक्री व्हावी असा आग्रह धरला होता. मात्र हा दर परवडत नसल्याचे सांगत मटण विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली होती. यावर तोडगा निघणे अवघड होऊन बसले होते. या वादात कोल्हापूरकरांचा थर्टीफर्स्टही कोरडाच गेला.

आजच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मटणविक्री बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी फक्त चिकन देणे सुरू केले होते.

शहरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाला. येथेच या वादाची पहिली ठिणगी पडली. या परिसरातील मटण विक्रेत्यांनी ५६० ते ५८० रुपये किलो दराने विक्री सुरू केली. त्यानंतर येथील दुकाने बंद पडू लागली. मात्र, नदीपलिकडे मटण ४६० किलोने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला. हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरू लागले. बंद असल्याने कोल्हापूरकर ताटातील झणझणीत मटणाला वंचित झाले होते. मात्र, कृती समितीने यावर तोडगा काढल्याने अखेर आजपासून मटण विक्री सुरू होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here