अहमदनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात राज्य सरकार आपली बाजू मांडण्यासाठी अपयशी व कमकुवत ठरले. आवश्यक तेवढे व जे पाहिजे ते वकील त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चिघळला,’ अशी टीका माजी मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. यांनी केली. ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळवला आहे हा देखील संशोधनाचा भाग आहे. मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्नही सुटला पाहिजे. अन्यथा सरकारला लोक रस्त्यावर फिरू देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

वाचा:

मराठा आरक्षणावरून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने होऊ लागले आहे. तसेच या मुद्द्यावरून राजकारणही चांगलेच पेटले आहे. त्यातच माजी मंत्री शिंदे यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. ते कर्जत येथे बोलत होते. शिंदे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस पावले उचलली. राज्याच्या विधिमंडळात कायदा आणला. उच्च न्यायालय तो कायदा टिकला. मात्र त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर मराठा आरक्षणाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात राज्य सरकार आपली बाजू मांडण्यासाठी अपयशी व कमकुवत ठरले. आवश्यक तेवढे व जे पाहिजे ते वकील त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चिघळला. त्या वेळेस विरोधी पक्षात होते ते आता सत्तेत आहे. मात्र त्यांनी हा प्रश्न का चिघळवला आहे, हा आता संशोधनाचा भाग आहे. मिळालेच पाहिजे. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्नाने देखील अतिशय गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणा सोबतच धनगर आरक्षणाचा प्रश्नही सुटला पाहिजे. अन्यथा सरकारला लोक रस्त्यावर फिरू देणार नाही. कारण राज्य सरकारातील लोक हे विरोधी पक्षात असताना एक बोलतात व सत्तेत असताना एक बोलतात, असे चित्र आता महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. मराठा आरक्षण व धनगर आरक्षण हे दोन्ही प्रश्न सुटले पाहिजेत. त्याशिवाय आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही,’ असा इशाराही शिंदे यांनी दिला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here