मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत सध्या तिच्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आहे. आणि कंगाना यांच्यातील वादाचे मुंबईसह महाराष्ट्रात पडसाद उमटले. महाराष्ट्र सराकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगनानं पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फोडले आहे. भिवंडी इमारत दुर्घटनेवरून तिनं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला घेरलं आहे.

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. यासंदर्भात एका युजरनं ‘सध्या दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला फक्त कंगनाच्या कार्यालयावर कारवाईसाठी वेळ आहे,’ असं ट्विट केलं होतं. या ट्विटला उत्तर देतानाच कंगनानं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाचं सुरु आहे. त्यांनी माझ्यावर टीका करणं सोडलं तर त्यांना लक्षात येईल त्यांचं राज्य कसं कोलमडतंय ते, असं ट्विट कंगनानं केलं आहे,’ आता कंगनाच्या या ट्विटला ठाकरे सरकार काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगनानं शेतकरी आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. कृषी विषयक विधेयकांना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केलेला विरोध, विधयके दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर पंजाब व हरयाणात भडकलेलं आंदोलन, विविध शेतकरी संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न या ट्विटच्या माध्यमातून केला. मात्र, हे ट्विट एम्बेड करत कंगना राणावतने मतप्रदर्शन केले आहे. ‘पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA ला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेलं नाही’, अशा प्रकारचं ट्विट कंगनाने केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here