सांगली: केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकामुळे शेतकरी बाजार समित्या, व्यापारी आणि दलालांच्या जोखडातून मुक्त झाला आहे, असे नमूद करत सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे रयत क्रांती शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. शुक्रवारी (ता. २५) संपूर्ण राज्यभर शेतात गुढ्या उभारून विधेयकाचे स्वागत केले जाईल, अशी माहिती आमदार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कृषी विधेयकाला विरोध करणारे माजी खासदार हे लुटारूंच्या टोळीचे नेतृत्व करीत असल्याची टीका आमदार खोत यांनी केली. ( Slams )

वाचा:

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे खोत यांनी कृषी विधेयकाचे स्वागत करीत केंद्र सरकारचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांना व्यापारी आणि दलालांनी लुटले. शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यांचे दारिद्र्य कायम राहिले, पण व्यापारी, दलालांची घरे भरली. केंद्र सरकारने संसदेत मांडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. वर्षानुवर्षे लुटणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी, दलालांची मक्तेदारी मोडून काढली. या विधेयकामुळे शेती उत्पादनांना चांगला भाव मिळेल. कंपन्यांमध्ये दराची स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. याशिवाय खासगी कंपन्यांकडून शेतीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची संधी आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने या विधेयकाचे स्वागत करण्यासाठी २५ सप्टेंबरला राज्यभर शेतकरी शेतात गुढ्या उभ्या करणार आहेत.’

वाचा:

बाजार समित्यांमधील राजकारणाबद्दल आमदार खोत म्हणाले, ‘काही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या जिवावर बाजार समित्यांचा राजकीय अड्डा तयार केला होता. तो उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्र सरकारने केले. बाजार समित्यांची मुदत संपली तरी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी नेत्यांकडे खेटे मारावे लागत होते. बाजार समित्यांची व्यवस्था ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ अशी झाली होती. यापुढे खरेदीदार, व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या दारात यावे लागेल.’

शेट्टींना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल

‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आता शेतकऱ्यांचे नेते राहिले नाहीत. भांडवलदार, व्यापारी आणि दलालांशी त्यांची नाळ जुळली आहे. यामुळे ते आता लुटारूंचे नेतृत्व करतात,’ अशी टीका आमदार खोत यांनी शेट्टी यांच्यावर केली. ‘ते यांच्या शाळेतील विद्यार्थी होते, मात्र ते परीक्षेत नापास झाले आहेत. शेतकऱ्यांचे नेते होण्यासाठी आता त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल,’ असा टोलाही खोत यांनी लगावला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here