वाचा:
विधानसभा मतदारसंघातील आशा सेविकांना विखे पाटील यांच्या सहकार्याने कोविड विमा पॉलीसीचे संरक्षण देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहाच्या निमित्ताने या पॉलिसीचे वितरण करण्यात आले. त्यावेळी विखे पाटील बोलत होते. ‘करोना काळात ज्यांच्यावर जबाबदारी होती, तेच घरात बसल्यामुळे सामान्य माणसाच्या हितासाठी कोणतेही काम राज्यात झाले नाही. याउलट पंतप्रधान मोदी यांनी संकटाच्या काळात सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी निर्णय प्रक्रिया राबविली. २० लाख कोटी रुपयांची आत्मनिर्भर भारत योजना जाहीर करुन उद्योजकांपासून ते पथविक्रेत्यापर्यंत आणि शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्वांना योजना देऊन हा देश पुन्हा आत्मविश्वासाने पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. देशाचा विकास दर खाली आला म्हणून मोदींच्या नावाने ओरडणाऱ्यांनी मागील सहा महिन्यात राज्यातील जनतेला कोणता दिलासा दिला? याचे आत्मपरीक्षण करावे. मोदींच्या निर्णयक्षमतेमुळे हा देश संकटातून वाचला. त्यामुळेच शिर्डी विधानसभा मतदारसंघात त्यांचा वाढदिवस आशा सेविकांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. आशा सेविकांना विमा पॉलिसीचे संरक्षण देण्याचा राज्यातील पहिला उपक्रम या निमित्ताने झाला,’ असेही विखे पाटील म्हणाले.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times