नवी दिल्लीः लोकसभेनंतर कृषी संबंधित विधेयकं राज्यसभेतही मंजूर झाली. मात्र, या कृषी विधेयकावर शेतकरी आणि विरोधी पक्षही आक्रमक आहेत. राज्यसभेत रविवारी झालेल्या गदारोळात उपसभापतींचा देखील अवमान करण्यात आला. राज्यसभेच्या उपसभातींसोबत घडलेल्या या घटनेसंदर्भात तीन केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

केंद्र सरकारचे तीन मंत्री , प्रह्लाद जोशी आणि पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला आणि ही घटना खेदजनक असल्याचं सांगितलं. याआधीसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्र सरकारच्या सहा मंत्र्यांनीही पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर काल हा मुद्दा उपस्थित केला होता.

खासदारांना मत द्यायचं होतं तर त्यांनी आपल्या जागेवर बसायला हवं होतं. १३ वेळा उपसभापतींनी खासदारांना पुन्हा जागेवर जाण्याची विनंती केली. संसदेसाठी हा दिवस लाजिरवाणा होता. माइक तुटला, वायर तुटल्या, नियम पुस्तिका फाडण्यात आल्या. मार्शल आले नसते तर उपसभापतींवर हल्लाही झाला असता, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पत्रकार परिषदेत म्हणाले.

आम्ही यापूर्वी अशा प्रकारचे असभ्य वर्तन कधीच पाहिले नाही. असं वर्तन करणाऱ्या सदस्याने कुठलाही वाद न घालता आणि नियमांनुसार खासदाराला सभागृहाच्या घराबाहेर जावं लागेल, असं नियम २५६ च्या कलम तीननुसार निलंबित करताना स्पष्ट गेलंय. मयादेच्या नियमांचे पालन करत नाहीत आणि ते लोकशाहीची भाषा करत आहेत. राज्यसभेत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. ११० खासदार आमच्यासोबत होते. त्याचवेळी ७२ जण विरोधात होते, असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या सदस्य आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलीय. कायद्यानुसार ते शक्य असेल तर त्यानुसार विचार केला जाईल, असं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले ८ खासदार संसदेच्या आवारात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन करत आहेत. निलंबनाच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here