वाचा:
मनसेने सविनय कायदेभंग करत लोकल प्रवास करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आधी ठरल्यानुसार मनसेचे सरचिटणीस तसेच अन्य कार्यकर्ते पोलिसांना गुंगारा देत लोकलमध्ये पोहचलेच. ठाण्यात यांनी अशाच प्रकारे कायदेभंग करत लोकलमध्ये प्रवेश केला. या लोकलप्रवासानंतर नेत्यांकडून आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या. ‘लोकल सामान्य प्रवाशांसाठी खुली व्हावी. दररोज मुंबईत येण्यासाठी त्यांना जे हाल सहन करावे लागत आहेत, ते थांबावेत, इतकीच आमची मागणी आहे. याबाबत सातत्याने सरकारला विनंती करूनही आमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही. त्यामुळं सरकारच्या नाकावर टिच्चून आम्ही आज कायदेभंग केला आहे’, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी मात्र कायदेभंग करणाऱ्या मनसैनिकांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.
वाचा:
आज केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनासाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे व इतर तीन पदाधिकाऱ्यांवर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनातिकीट व दरवाजात लटकून प्रवास करणे, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, अशा विविध कारणांसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times