नवी दिल्लीः संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारकडून संसदेत अनेक विधेयकं संसदेत मंजूर करण्यात आली आहेत. येत्या काही आणखी बरीच विधेयकं राज्यसभेत मंजूर करावी लगणार आहेत. दरम्यान, भाजपने मंगळवारी आपल्या खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.

भाजप मंगळवारी राज्यसभेच्या खासदारांना सभागृहात हजर राहण्यास सांगितलं आहे. यासाठी भाजपाने खासदारांना व्हिप जारी केलंय. खासदारांनी राज्यसभेत उपस्थित रहावं आणि सरकारच्या भूमिकेचं समर्थन करावं, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यसभेत आज एक महत्त्वपूर्ण विधेयक सरकारच्या माध्यमातून आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरून विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घातला. विरोधी पक्षांच्या गदारोळात सरकारने कषी विषयक विधेयकं मंजूर करून घेतली. ही विधेयकं आधी लोकसभेत मंजूर करण्यात आली होती.

लोकसभेने बिले मंजूर केली

विदेशी योगदान नियमन कायद्यात सुधारणा करणारे विधेयक २०२०, साथीचे रोग सुधारणा विधेयक २०२० हे दोन विधेयक सोमवारी लोकसभेमधून मंजूर झाले. या व्यतिरिक्त, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०२० देखील लोकसभेनं मंजूर केलं. हे विधेयक राज्यसभेने यापूर्वीच मंजूर केलं आहे. यासह, केंद्रीय होमिओपॅथी (सुधारणा) विधेयक, २०२० आणि भारतीय वैद्यकीय केंद्रीय परिषद (सुधारणा) विधेयक, २०२० लोकसभेत मंजूर झाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here