करोना संसर्गाच्या भीतीने अनेक रुग्णालयांमध्ये गुंतागुंतीच्या नाकारल्या जात असताना येथील या पंधरा वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून फुटबॉलच्या आकाराइतकी मोठी गाठ डॉक्टरांनी काढली आहे. या गाठीचे वजन १.५ किलो असून ती १६ सेंटीमीटर इतके आहे. तातडीने केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे या मुलाला जीवनदान मिळाले आहे.
कोविडच्या लक्षणासारखी दम लागणे, छातीत दुखणे तसेच श्वास घ्यायला त्रास होण्याच्या तक्रारीमुळे प्रतीकला रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केल्यानंतर त्याच्या फुफ्फुसामध्ये गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ छातीच्या पोकळीत असल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. खासगी रुग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात आली. धुराच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या या गाठीला सॉलिटरी फ्रायबर ट्यूमर म्हटले जाते.
वाचा:
प्रतीकला जाणाणारे त्रास करोनाच्या लक्षणांसारखे असल्यामुळे त्याला उपचार देण्यासाठी आढेवेढे घेण्यात येत होते. त्यामुळे ही गाठ फुटबॉलच्या आकाराइतकी झाली. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला तर त्रास होत होता. शरीराच्या इतर अवयवांचे कार्यही बाधित झाले होते, असे या रुग्णाच्या कुटुंबीयांनी सांगितले. योग्यवेळी शस्त्रक्रिया केल्यामुळे त्याच्या जीवावर बेतलेले संकट टळले. त्याच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत असल्याचे डॉ. भालेराव यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times