कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. सध्या भाजपशी उघडउघड संघर्ष करणाऱ्या शिवसेनेनं लोकसभेत विधेयकांना पाठिंबा दिला. राज्यसभेत मात्र विरोधात भाषण करून शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. ‘ हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांना भूमिकाच घेता येत नाही. आमच्यासोबत सरकारमध्ये असताना ते कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांसारखे वागायचे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल हाणला होता. तर, शिवसेनेचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ असतो, असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर अशीच टीका केली होती.
वाचा:
आता माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकांवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता कृषी विधेयकांवर शिवसेनेनं लोकसभा व राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली आहे. लोकसभेत पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला आहे. याचं कारण शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाहीत. त्यांना नेता मानत नाहीत. संजय राऊत ९९ टक्के शिवसैनिकांना खटकतात, त्यामुळंच संधी मिळेल तेव्हा ते त्यांच्या विरोधात भूमिका घेतात आणि पक्षाची भूमिका बाजूलाच राहते,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times