राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी दिला होता. १०० कोटी रुपयांची कामे केल्यानंतर वर्षभरातच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ड्रेनेज आणि रस्ता खुदाईची कामे कॉन्ट्रॅक्टर विनापरवाना करत आहेत. यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने मृत्युंजय महापूजा आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासनाचा निषेध करीत कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
वाचा:
यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहिते म्हणाले, ‘रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत दलित महासंघाने आयुक्तांना जाब विचारला होता. मात्र, त्यांनी आम्ही काहीच करू शकत नाही, असे उत्तर देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. जबाबदारी टाळणाऱ्या आयुक्तांचा दलित महासंघाच्या वतीने जाहीर निषेध. लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला सद्बुद्धी यावी, अशी अपेक्षा आहे.’ यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात वनिता कांबळे, गणेश भोसले, रामभाऊ पाटील, धर्मेंद्र कोळी, अरुण चव्हाण, सुरेखा मोरे, राजेश कुरणे, आशा पवार, आदी उपस्थित होते.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times