वाचा:
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना व कंगना आमनेसामने आले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाई केली होती. ही कारवाई बेकायदा असल्याचं सांगत तिनं महापालिकेच्या विरोधात नुकसानभरपाईचा दावा केला आहे. ‘माझ्या बंगल्यालगतच फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा याचा बंगला आहे. त्या बंगल्यातही कथित बेकायदा बदल व अतिरिक्त बांधकाम करण्यात आलं आहे. पालिकेकडून त्यालाही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याला सात दिवसांचा वेळ देण्यात आला तर मला फक्त २४ तासांची नोटीस देऊन तडकाफडकी कारवाई करण्यात आली, असं कंगनानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
वाचा:
या प्रकरणावर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढं आज सुनावणी झाली. त्यावेळी, संजय राऊत यांनी माझ्याविषयी काही विधाने केली. त्यानंतरच महापालिकेने दुष्ट हेतूने आणि आकसापोटी बंगल्यावर तोडकामाची कारवाई केली, असा आरोप करत कंगनाने कोर्टात राऊत यांच्या विधनांविषयीची एक डीव्हीडी सादर केली. तेव्हा हे तुम्हाला कोर्टाच्या नोंदीवर आणायचे असेल तर राऊत यांना प्रतिवादी करावे लागेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यानंतर कंगनाच्या विनंतीवरून न्यायालयानं संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी देणारा आदेश काढला.
वाचा:
‘मनीष मल्होत्राच्या बंगल्यावरील कारवाईविषयी कंगनानं केलेल्या दाव्याची दखल घेत अशा बंगल्यांविषयी किती दिवसांची नोटीस दिली होती आणि कारवाई झाली का?, त्याचा तपशील शुक्रवारी सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times