म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: देशात करोनाचा कहर वाढत असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी पीपीई (personal equipment protection) किट घालून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी रविवारी (२० सप्टेंबर) चिखली घरकुल येथे चार बंद घरे हेरून चोरीचा प्रयत्न करीत होते. या चौघांनी पीपीई किट घातले होते. याबाबतचे चित्रण असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहे. त्यातच रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेली उपकरणे डॉक्टर आणि वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेत उपलब्ध होण्यावरुन वादाचे प्रसंग घडले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना चोरटे पीपीई किट घालून बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते.

घरकुल परिसरात आलेल्या या चार चोरट्यांनी बंद घरे हेरून ठेवली असल्याचेही प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या चोरट्यांनी एका घराच्या लोखंडी दाराचा कडीकोयंडा तोडला. परंतु, तेवढ्यात आवाज झाल्याने या चार चोरट्यांनी तेथून पळ काढला. या चारही चोरट्यांकडे कटावणी, लोखंडी पक्कड आदी साहित्य असल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या चौघांना चोरी करता आली नाही. परंतु त्यांनी पीपीई किट कुठून मिळविले, त्याचा करोना‌ उपचार केंद्राशी काही संबंध आहे का? हे या चोरट्यांना पकडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. चिखली आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here