श्रीनगर: जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला भूकंपाचे धक्के जाणवलं आहेत. श्रीनगर-लेह महामार्गालगत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

काश्मीरमध्ये या भूकंपाबाबत अफवा देखील पसरल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील काही ट्विटर यूजर्सनी हा संशयास्पद स्फोटामुळे हे हादरे बसल्याचं काहींचं म्हणणं आहे. मात्र, आत्तापर्यंत अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतंही विधान केलेलं नाही.

भूकंपाचे धक्के हे मंगळवारी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान जाणवले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजीचे अधिकारी आता या भूकंपाशी संबंधित माहिती गोळा करत आहेत. या भूकंपामुळे अद्याप कुठल्याही नुकसानीची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

यापूर्वीही उत्तर भारतात अनेक भागत भूकंपाचे हादरे

उत्तर भारतातील सर्व भागात गेल्या काही दिवसांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. , हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि ईशान्येकडील काही भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here