वाचा:
शहर व उपनगरांत मंगळवारी दिवसभर हलका होता. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे तीन तास सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी भरले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. मालाड, अंधेरी, खार, दादर या भागांतही पाणी भरले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. मुंबई पालिकेने याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
अशी वळवली वाहतूक…
– उड्डाणपुलमार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
– भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
– सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
– मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)
– लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
– भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
– जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे
मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत मुंबईत खालीलप्रमाणे सरासरी पाऊस झाला:
शहर – ७३.५२ मिमी
पूर्व उपनगरे – २७.८७ मिमी
पश्चिम उपनगरे – ७८.६८ मिमी
वाचा:
आज काही भागांत मुसळधार
मुंबईत रात्रभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिवसभर कोसळणाऱ्या हलक्या सरी तसेच सायंकाळनंतर वाढलेला पावसाचा जोर यामुळे मुंबईतील हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत आज तापमानाचा पारा २६ डीग्रीपर्यंत खाली येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times