पिंपरी: येथील रस्ते विकासाच्या संदर्भात महापालिकेचे आयुक्त यांनी राज्य शासनाला दिशाभूल करणारा अहवाल दिल्याचा आरोप महापौर यांनी मंगळवारी केला. मात्र, स्थायी समितीमध्ये मंजूर झालेला वस्तुनिष्ठ अहवाल सादर केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. (Mayor Slams Municipal Commissioner )

वाचा:

वाकड येथील रस्ते काँक्रीटीकरणाच्या मुद्यावरून पालिकेत अजूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून सत्तारूढ भारतीय जनता पक्षामध्येच दोन गट पडले आहेत. त्यात आता महापौर माई ढोरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून आयुक्त हर्डीकर यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे वादाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाकड येथील प्रभाग क्रमांक २५ मध्ये विशेष योजनेंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणाची कामे करावीत, असा प्रशासकीय प्रस्ताव २७ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर होता. या चर्चेच्या वेळी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये रस्ते काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरणाची कामे करावीत, अशी सूचना अध्यक्ष संतोष लोंढे यांनी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून प्रस्ताव दप्तरी दाखल झाल्याचा अहवाल आयुक्त हर्डीकर यांनी राज्याच्या नगरविकास खात्याला दिला, असे महापौरांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

वाचा:

शहरात सध्या करोनाचा प्रादुर्भाव आहे. आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत एकाच प्रभागात शंभर कोटी रुपये खर्चाची विशेष योजना राबविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरणाची कामे करावीत. त्यामुळे खर्चात बचत होईल. याशिवाय एकाच प्रभागात शंभर कोटी रुपयांची कामे केल्यास शहरातील अन्य प्रभागतही त्याप्रमाणे मागणी होईल, अशी भीती व्यक्त करून आयुक्तांचा अहवाल फेटाळावा आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

वाचा:

विशेष योजनेंतर्गत शहरात केवळ एकाच प्रभागात शंभर कोटी रुपयांची विकासकामे करणे संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे रस्ते काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्याची सूचना स्थायी समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली होती. मात्र, आयुक्तांनी शासनाला दिशाभूल करणारा अहवाल दिल्याचा आमचा दावा आहे-

– माई ढोरे, महापौर)

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here