नवी दिल्लीः याचा साथीदार याची दुबईतील २०३ कोटींहून अधिकची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने ( ED) मंगळवारी जप्त केली. जप्त मालमत्तेत मिर्चीच्या कुटुंबातील सदस्यांच्या १५ व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता आहेत. त्यामध्ये मिडवेस्ट हॉटेल अपार्टमेंट्स नावाचे हॉटेल देखील आहे, अशी माहिती ईडीने दिली.

पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत जप्ती

इक्बाल मिर्चीच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास २०३.२७ कोटी इतकी आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी ( (पीएमएलए)) कायद्यांतर्गत ही कारवाई केली, अशी माहिती ईडीने दिली आहे. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या वाधवान बंधुंच्या मालकीच्या दुबईतील कंपनीने ही संपत्ती मिर्ची कुटुंबाला हस्तांतरित केली होती, असं ईडीने सांगितलं.

वाधवान ब्रदर्सने मिर्चीला दिली होती ही मालमत्ता

वाधवान बंधू ( wadhwan brothers ) हे दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेड ( DHFL ) चे प्रवर्तक आहेत. ईडीने त्यांना येस बँकेने दिलेल्या एका संशयास्पद कर्जाच्या प्रकरणात अटक केली होती. ईडीने कपिल वाधवनलाही मिर्ची पीएमएलए प्रकरणी अटक केली होती. पण नंतर त्यांना जामीन मंजूर झाला.

आतापर्यंत ७७६ कोटींची मालमत्ता जप्त

या कारवाईसह ईडीने आतापर्यंत एकूण ७७६ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ईडीने असेच दोन जप्तीचे आदेश जारी केले होते. मिर्चीचा २०१३ मध्ये लंडनमध्ये मृत्यू झाला होता. इक्बाल मिर्ची हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात होता. आणि मिर्ची दाऊदचा अंमली पदार्थांचा व्यापार आणि खंडणीची कामं करत होता, असं सांगितलं जातं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here