मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळं जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. पुढील २४ तासात आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

लाइव्ह अपडेट्स:

मुंबई सेंट्रल एसटी आगारात भरले पाणी; ३५ वर्षांत प्रथमच भरले एवढे पाणी

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे आज सकाळी ११ वाजेपासून विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन करणार परिस्थितीची पाहणी

वरळीतील घरांमध्ये पाणी तुंबल्याचा व्हिडिओ ट्वीट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा शिवसेनेला टोला

पाण्याचा निचरा करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू – महापालिका आयुक्त चहल यांची माहिती

अत्यावश्यक सेवा वळगता इतर सर्व कार्यालये व आस्थापने बंद ठेवण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, महापालिकेच्या सूचना

मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते चर्चगेट लोकल सेवा बंद. विरार ते अंधेरीपर्यंतच धावताहेत लोकल

पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांत व रेल्वे रुळांवर साचले पाणी

ना म जोशी मार्गावरील बीडीडी चाळ क्र. ८, ९, १०, ३२, २४ आणि ३० चा तळ मजला पाण्याखाली

मुंबईत कालापासून तुफान पाऊस. शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरूप

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here