म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

श्रीलंका, वेस्ट इंडिज अशा फार कस न लागणाऱ्या संघांविरुद्ध मालिकाविजय साजरे केल्यानंतर भारतीय संघ आज, मंगळवारपासून आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या कडव्या किंबहुना खऱ्याअर्थाने तुल्यबळ संघाचा सामना करणार आहे. श्रीलंका, वेस्ट इंडिजआधी टीम इंडियाने बांगलादेशशी दोन हात केले होते. बघायला गेले तर विंडीज आणि बांगलादेशने भारताचा किमान प्रतिकार तरी केला. तेव्हा भारतीय संघाचे काही कमकुवत दुवे प्रामुख्याने पुढे आले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा चुका पराभवाला कारण ठरू शकतात. त्यामुळे भारताला खेळात सफाई आणावी लागेल.

वाचा-

गेल्यावर्षी याच ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वनडे मालिका ०-२ अशा पिछाडीवरून जिंकून दाखवली होती. क्षेत्ररक्षण, डावाच्या मधल्या षटकांमधील गोलंदाजी आणि विराट आणि रोहित शर्मा यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांमध्ये नसलेले सातत्य या कळीच्या मुद्यांवर टीम इंडियाने एव्हाना तोडगा शोधला असेल, अशी अपेक्षा आहे.

विकेटची भूक

दुखापतीतून सावरत भारतीय संघात पुनरागमन केलेला आधीसारखे घवघवीत यश मिळवण्यासाठी आतुर आहे. बुमराहबरोबरच मोहम्मद शमी, नवदीप सैनी यांचाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खऱ्या अर्थाने कस लागेल. जागतिक दर्जाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या तंबूत आहेत. त्यांचा तरुण तडफदार फलंदाज मार्नस लबुसचाग्ने याने तर कसोटीत धावांचा रतीबच लावला आहे. त्याचा अडसर भारतीय गोलंदाज कसे दूर करणार हे बघणेदेखील महत्त्वपूर्ण ठरेल.

असेही द्वंद्व

अशी मालिका रंगतानाच प्रत्येक लढतीत काही छोटीछोटी द्वंद्वदेखील बघायला मिळतील. रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यातील धावांची चुरस. आणि स्टीव्ह स्मिथ यांचे द्वंद्वदेखील तीन वनडेंच्या मालिकेत औस्तुक्याचे कारण ठरेल. विराट, रोहितबाबत चिंता नाही. मात्र धावांसाठी अजूनही धडपडणारा शिखर धवन, राहुल आणि नव्या दमाचा श्रेयस अय्यर यांना पॅट कमिन्सकडून सावध राहावे लागेल. आयपीएलमधून कमिन्सला घसघशीत करार मिळाला आहे. याशिवाय केन रिचर्डसन आणि ऑस्ट्रेलिया ज्याच्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवते असा मिचेल स्टार्क अक्षरशः झोकून देत खेळतात. तेव्हा उभय संघांमधील ही खेळाडूंमधील लहानमोठी युद्ध जिंकल्यास लढत जिंकणे संबंधित संघांना सोपे जाईल. संधी मिळाल्यास केदार जाधवने चुणूक काधवणे खूप गरजेचे आहे. अन्यथा वाढते व आणि ढासळणारी कामगिरी त्याला संघाबाहेर करू शकते. मनीष पांडेसारखा फलंदाज आजही बाहेर बसला आहे, हे केदारने लक्षात घ्यायला हवे.

>> डेव्हिड वॉर्नरला पाच हजार वनडे धावांचा पल्ला गाठण्यासाठी दहा धावांची आवश्यकता आहे. तसेही या निमित्ताने त्याच्या नावावर आणखी एक विक्रमही जमा होईल. हा टप्पा कमी डावांत गाठणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन ठरेल. पाच हजारांचा टप्पा डीन जोन्स यांनी १२८ डावांत गाठला होता. तो विक्रम वॉर्नर मोडेल. सध्या वॉर्नरचे अवघे ११४ डाव झाले आहेत.
>> वनडेतील विकेटचे शतक करण्यासाठी पॅट कमिन्सला चार विकेटची आवश्यकता आहे. या लढतीच्या निमित्ताने आणखी एक योगायोग जुळून येऊ शकतो. कमिन्स, स्टार्क आणि हॅझलवूड हे त्रिकूट नोव्हेंबर २०१८नंतर प्रथमच वनडेत एकत्र खेळण्याची शक्यता आहे.
>> वनडे विकेटचे शतक करण्यासाठी कुलदीप यादवला एका विकेटची आवश्यकता आहे.

‘संघांतील समन्वय बघायला गेले तर आम्ही आणि ऑस्ट्रेलिया संघ जगातील अव्वल दोन संघ आहोत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. मालिका भारत होते आहे. तेव्हा इथल्या वातावरणाची आम्हाला छान जाण आहे. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू’
विराट कोहली (भारताचा कर्णधार)

‘गेल्यावर्षी भारतात पार पडलेल्या वनडे मालिकेत आम्ही विजयश्री मिळवली होती; कारण भारताच्या स्पिनरविरुद्ध यश मिळवण्याची किल्ली आम्हाला सापडली होती. भारताकडे जागतिक दर्जाचे स्पिनर आहेत. त्यांच्यावर कडी करण्याच यश मिळणे ही मोठीच गोष्ट आहे’
अॅश्टन टर्नर (ऑस्ट्रेलियाचा फलंदाज)

वेळः दुपारी १.३० पासून
स्थळः वानखेडे स्टेडियम, मुंबई

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here