बिहारचे पोलीस महासंचालक यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणूका तोंडावर असताना पांडे यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती चांगलीच चर्चेत आली आहे. याप्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं एक सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय. बिहारचे डिजीपी यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी सातत्याने महाराष्ट्र आणि पोलिसांवर टीका केली. ते आता राजकीय पक्षात जातील. हे मला अपेक्षितचं होतं. जे, महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलतायेत त्यांचं पुढचं पाऊल राजकारणात, त्यासाठी महाराष्ट्र, मुंबईला पायपुसणं म्हणून वापरतात, असं ते म्हणाले.
बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून कागांवा करायचा आणि मला त्याच्यात ओढवून राजकारण करायचं हा हेतू आहे, असा टोला संजय राऊत यांनी कंगनाला लगावला आहे. त्याचबरोबर, बेकायदेशीर बांधकाम झालं असेल तर ते तोडण्याचे अधिकार बीएमसीला आहे. बीएमसी स्वतंत्र संस्था आहे. ते आम्ही किंवा न्यायालय पण ठरवू शकत नाही, असं नमूद करतानाच आम्ही बाळासाहेबांच्या हाताखाली घडलो आहोत माझ्यावर १६० खटले आहेत. आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयाची लढाई नवी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अभिनेत्री कंगना रणावत हिच्या बंगल्यावर केलेल्या कारवाईनंतर कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर तिनं संजय राऊत यांनाही कोर्टात खेचले आहे. संजय राऊत यांनी माझ्याविषयी काही विधाने केली. त्यानंतरच महापालिकेने दुष्ट हेतूने आणि आकसापोटी बंगल्यावर तोडकामाची कारवाई केली, असा आरोप केल्यानंतर न्यायालयानं संजय राऊत यांनाही या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times