मुंबई: आर्थिक मंदीचा परिणाम देशभरातील रोजगार निर्मितीवरही पडत आहे. आर्थिक मंदीने रोजगाराच्या संधी हिरावल्याचे उघड झाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात कमी नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे.

एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात जवळपास १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. मागील वर्षी एकूण ८९.७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. त्यात यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात घट होणार आहे. या अहवालानुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमधील नागरीक नोकरीच्या निमित्ताने परराज्यात, दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत घट झाली असल्याचे समोर आले आहे.

पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या. मात्र, याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचे समोर आले आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ)ने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८९.७ लाख नवे रोजगार निर्माण झाले होते. मागील आर्थिक वर्षात ज्यांना रोजगार मिळाले त्यांचे अधिकाधिक मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांच्या घरात होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here