मुंबईः मुंबईतील पाऊस ओसरला तरी पाण्याचा निचरा होत नव्हता याबाबत चिंता व्यक्त करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील अन्य ठिकाणचे पाणी का ओसरत नाही? असा सवाल उपस्थित केला. मुंबईत गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं मुंबईतील काही भागांत पूरसदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे.

‘पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका. नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?
हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही?११६% नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?,’ असे प्रश्न उपस्थित करत शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत केली. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा शांतता राखा, सरकारचे बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे, असा टोलाही लगावला आहे.

दरम्यान, मंगळवारपासून मुंबईत तब्बल २८६.४ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची गणना अतिवृष्टीमध्ये केली जाते. मुंबईच्या पावसाने केलेल्या फटकेबाजीने नवा विक्रम रचला आहे. सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या पावसानं गेल्या अडीच दशकांमध्ये पहिल्यांदाच फक्त २४ तासांत मुंबईत सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. या पावसानं २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

आज काही भागांत मुसळधार

मुंबईत रात्रभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिवसभर कोसळणाऱ्या हलक्या सरी तसेच सायंकाळनंतर वाढलेला पावसाचा जोर यामुळे मुंबईतील हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत आज तापमानाचा पारा २६ डीग्रीपर्यंत खाली येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here