मेष: शुभ काळ…
सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्याचा मेष राशीतील संचार हा १० व्या घरात असणार आहे. यातून या राशीच्या व्यक्तींना अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबीय आणि मित्र परिवाराकडून चांगली मदत होईल.
वृषभ: मानसिक अस्थिरतेचा काळ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक अस्थिरतेने तणावाचा काळ असेल. प्रवासाचा बेत ठरेल. भावंडांना कठीण परिस्थितीशी सामना करावा लागेल. पण ज्या व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायात प्रमोशनची वाट पाहात आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होईल. यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील इतकच.
मिथुन: मुलांची काळजी घ्या
मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. बेरोजगार असाल तर रोजागारासाठी परिश्रम करावे लागतील. तुमच्या सध्याच्या कार्यक्षेत्रात अनेक कठिण प्रसंगांना सामोरं जावं लागेल. वरिष्ठांसोबत वादावादी टाळा. खर्चावर नियंत्रण असावं.
कर्क: आर्थिक अडचणींचा काळ
जोडीदारासोबत वादाचा काळ आहे. आर्थिक घडी बसवावी लागेल. अपयशाने खचून जाऊ नका. नव्या कार्यासाठी योजना आखा. योग्य विचार करुन निर्णय घ्या.
सिंह: सरकारी नोकरीत यशाचा योग
सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे सिंह राशीसाठी अनेक चांगले योग असणार आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. याशिवाय, कोर्टकचेरीच्या गोष्टी प्रलंबित असतील तर त्याही पूर्ण होतील. अर्थात अतिकामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. त्याकडे लक्ष द्या.
कन्या: शैक्षणिक अडथळे
कन्या राशीसाठी मकर संक्रांतीचा काळ अनेक बदल घडवणार ठरेल. शिक्षणाच्या बाबतीत अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता. लहान मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पण आत्मविश्वाच्या जोरावर अडचणींवर मात करता येईल.
तुळ: आरोग्यसंबंधी अडचणी
मकर संक्रांतीचा काळ तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टीने हितकारी नाही. त्यामुळे आरोग्यासंबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांकडून सर्व कार्यात मदत होईल. हातात पैसा असल्याने काम अडून राहणार नाही. त्यामुळे चिंतेचं कारण नाही.
वृश्चिक: लहान मुलं खूश करतील
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना लहान मुलांकडून आनंद प्राप्त होईल. व्यावसायिकांना यात्रेतून लाभ मिळेल.
धनु: कौटुंबिक विवाद
धनु राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादविवाद टाळावेत. याशिवाय, कौटुंबिक प्रश्नांवर बोलताना काळजी घ्यावी. तुमच्या वडिलधारी मंडळींना लाभ होईल. व्यावसायिकांची रखडलेली कामं पूर्ण होतील.
मकर: आरोग्याची काळजी घ्या
मकर राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीला आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मात्र, चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असेल. आर्थिक लाभ होईल.
कुंभ: डोळेविकारांची शक्यता
कुंभ राशीच्या व्यक्तींनी डोळ्यांची काळजी घ्यावी. विदेशातील रखडलेली कामं पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. परदेश दौऱ्याचा विचार ठाम होईल.
मीन: भेट आणि सन्मानाचा लाभ
मीन राशीसाठी मकर संक्रांतीचा योग लाभदायी ठरणार आहे. या दिनी भेटवस्तूंचा लाभ होईल. सरकारी कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. पगारात वाढ होईल. विरोधकांचा पराभव आणि उधारी वसूल होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times