सुरेश अंगडी ११ सप्टेंबरला करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये त्यांना दाखल केलं गेलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. करोनाने निधन झालेले ते कर्नाटकातील दुसरे खासदार आहेत. याआधी अशोक गस्ती यांचे काही दिवसांपूर्वी करोनाने निधन झाले. गस्ती हे राज्यसभेचे खासदार होते.
करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीतील एम्समध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरेश अंगडी हे ६५ वर्षांचे होते. चार वेळा ते बेळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
सुरेक्ष अंगडी यांच्या निधनाने राजयकीय क्षेत्र हादरलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अंगडी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सुरेश अंगडी हे असामान्य कार्यकर्ते होते. त्यांनी कर्नाटकात पक्ष बळकट करण्यासाठी मोठे परीश्रम घेतले. ते एक उत्तम खासदार आणि प्रभावी मंत्री होते. राजकीय क्षेत्रात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जात होती. त्यांच्या निधनाने दुःखी झालो. या दुःखाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांबद्दल संवेदना व्यक्त करतो’, असं पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते ( JDS ) एच. डी देवेगौडा यांनीही सुरेश अंगडी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times