पिंपरी: संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेची अस्तित्त्वात असलेली (सीसीसी) खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला. ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ‘s )

वाचा:

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपाययोजना करताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब तसेच दीर्घकाळाची लढाई विचारात घेत पालिकेने कोविड केअर सेंटर (सीसीसी) चालविण्यासाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘ए’, ‘बी’, ‘सी’ अशा तीन विभागात वर्गवारी केली आहे. त्यानुसार सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, खासगी रुग्णालये, संघटना वैद्यकीय संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविले होते. त्यातून पात्र संस्थांची निवड करण्यात आली आहे.

वाचा:

पालिकेने कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेंटरमध्ये करोना पॉझिटिव्ह पण लक्षणे काहीच नाहीत किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. खासगी संस्थांकडून दर मागविल्यानंतर प्रस्ताव तयार करण्यात आला. तो स्थायी समितीच्या मागील बैठकीत तहकूब ठेवण्यात आला. सदस्यांनी माहिती मागविल्यानंतर त्यांचे समाधान झाले. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या निर्णयामुळे जम्बो रुग्णालयासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला आहे. खासगी संस्थेने डॉक्टर, नर्ससह मनुष्यबळ पुरवायचे आहे. त्यानुसार एका बेडला दिवसाला किती दर दिला जाईल, असा तपशील मंजूर करण्यात आला आहे.

संस्थेचे नाव / स्थळ / बेडसंख्या
ट्रस्ट हेल्थ केअर / रावेत, मोशी / ४००
आयकॉन हॉस्पिटल / घरकुल इमारत / ८००
डीवाईन हॉस्पिटल / घरकुल इमारत / ४००
डॉ. भिसे हॉस्पिटल / महाळुंगे / ८००
रुबी अलकेअर / महाळुंगे / ६००
बीव्हीजी इंडिया / बालेवाडी, आकुर्डी / ५००

वाचा:

भामा-आसखेडसाठी ठेकेदार

आंद्रा आणि भामा-आसखेड प्रकल्पासाठी नवलाख उंब्रे ते देहूपर्यंत पाण्याची गुरुत्व नलिका टाकण्यात येणार आहे. त्यासाठी १४९ कोटी ९७ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला याच बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. आंद्रा धरणातून ३६.८७ दशलक्ष लिटर आणि भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष लिटर पाणी मिळण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here