पाटणाः बिहारच्या पोलिस महासंचालक (DGP) पदावरून यांनी मंगळवारी ऐच्छिक सेवानिवृत्ती (VRS) घेतली. व्हीआरएस घेतल्याच्या एक दिवसानंतर त्यांनी बुधवारी फेसबुक लाइव्हमधून संवाद साधला. संधी मिळाली तर मी निवडणूक लढवीन. मी स्वतंत्र नागरिक आहे. मी निवडणुकीत नक्कीच उतरेन. मी कुणाच्या भीतीने गप्प बसणार नाही, असं पांडे म्हणाले.

बिहार सरकारचे पोलिस महासंचालक आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) १९८७ च्या बॅचचे अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांनी यापूर्वीही व्हीआरएससाठी अर्ज दिला होता. राज्य सरकारने मंजूरही केला होता. गुप्तेश्वर पांडे यांना गेल्या वर्षी बिहारचे पोलिस महासंचालक (DGP) केले गेले होते. पांडे हे पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त होणार होते.

व्हीआरएस घेतल्यानंतर एक दिवसानंतर माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या फेसबुक लाइव्हवरून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेबद्दल माहिती दिली. ‘निवडणूक लढवणं पाप आहे का? व्हीआरएस घेऊन निवडणुका लढवणं हे पाप आहे का? मी काय हे पहिल्यांदाच करतोय का?’ असं पांडे म्हणाले.

‘सुशांत प्रकरणात मी काय चूक केली?’

‘काही लोक माझ्या व्हीआरएसला सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी जोडण्याचा विचार करत आहेत. मी सुशांत प्रकरणात चूक केली का? मला फाशी द्या. गोळ्या घाला. पण मी असा काय गुन्हा केला आहे. तो बिहारचा सुपुत्र होता. तो देशाचा अभिमान होता. माझ्या व्हीआरएससंबंध सुशांतशी का जोडला जातोय?’ असा प्रश्न पांडे यांनी केला. ज्या दिवशी सुशांतच्या मृत्यूची बातमी आली दुसर्‍याच दिवशी त्याच्या वडिलांना भेटायला गेलो, असं पांडेंनी सांगितलं.

‘मी ३४ वर्षांच्या सेवेत कुणाला थप्पड मारणं सोड्या ओरडूनही कुणाशीही कधी बोललो नाही. प्रत्येकाशी प्रेमाने बोललो. माझ्या कार्यकाळात पोलिस मुख्यालयाचे दार सर्वसामान्यांसाठी खुले झाले, असं पांडे म्हणाले.

‘व्हीआरएससाठी भाग पाडलं’

‘मी भावुक व्यक्ती आहे. मी भावनिकतेने काम करतो. व्हीआरएस घेण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण मला व्हीआरएस घेण्यास भाग पाडलं गेलं. तेथे १ हजाराहून अधिक कॉल येत होते. ५५०० पर्यंत मेसेज येत होते. त्याचा सामना करणं सोपं आहे का? माझ्या व्हीआरएसवरून खूप वाद वाढवला गेला. तुम्ही राजीना देताय का? असं पत्रकार, अधिकारी आणि नेते विचारू लागले. सततच्या प्रश्नांमुळे मी चिंतेत पडलो. एका वेबसाइन एका महिन्यापूर्वीच माझ्या राजीनाम्याची बातमी चालवली, असं पांडे यांनी सांगितलं.

‘आता बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. कधीही आचारसंहिता लागू शकते. इतक्या अफवा उडवल्यानंतर मी कसं काम केलं असतं. माझ्यावर पक्षपाताचे आरोप झाले असते. ३४ वर्षांच्या सेवेत निष्पक्षतेने काम केलं आणि आता काही महिने राहिले होते. पण माझ्यावर आरोप केले गेले. जनतेच्या संपर्कात राहणं माझ्या स्वभावात आहे, असं पांडे म्हणाले.

‘मुख्यमंत्री नितीश कुमारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही’

‘बिहारमधील पोलिस यंत्रणा सुधारण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांची महत्त्वाचे योगदान आहे. नितीश कुमार पोलिसांच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाहीत. आता तुम्ही याला राजकीय वक्तव्यही समजू शकता, असं पांडे म्हणाले.

‘मी जर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करू शकतो. निवृत्त झाल्यानंतर मी काय करावं? आता मी मरावं? ट्रोल्सच्या भीतीने आणि निराशेने बसून राहू. मला संधी मिळाल्यास मी निवडणूक लढवीन. मी स्वतंत्र नागरिक आहे. नक्कीच निवडणुकीच्या मैदानात उतरेन, असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितंल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here