चेतकला बजाजने इलेक्ट्रिक ब्रँड अर्बानाईट अंतर्गत सादर केलं आहे. या स्कुटीची लूक रेट्रो आहे. तर यात कर्वी बॉडीवर्क, मल्टी स्पोक अलॉय व्हील्स, स्विचगियर, फुल एलईडी लायटिंग आणि डिजीटल कंसोल आहे. या दुचाकीचे आरसे, स्टँड आणि फुट स्टँडसाठी उच्च दर्जाच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे.
चेतक स्कुटीमध्ये बजाजकडून ४kw इलेक्ट्रिक मोटार आणि IP67 रेटेड लिथिय आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. इको आणि स्पोर्ट्स हे दोन रायडिंग मोडही मिळणार आहेत. एकदा फुल चार्ज केल्यास ही स्कुटी इको मोडमध्ये ९५ कि. मी. आणि स्पोर्ट्स मोडमध्ये ८५ कि. मी. चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. पुण्यातील रस्त्यांवर चालवल्यानंतर हा दावा करण्यात आल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.
सुरुवातीला ही स्कुटी बजाजकडून केटीएम शोरुमद्वारे विकली जाणार आहे. विक्रीसाठी नवीन डीलरशीपही तयार केल्या जातील. मार्केटमध्ये चेतक ओकिनावा आय प्रेज आणि अथर ४५० यांसारख्या वाहनांना टक्कर देणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times