मुंबई: नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेवर अनेक आरोप करणारे माजी खासदार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोफ डागली आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिवसेनेवर होणाऱ्या आरोपांच्या निमित्तानं नीलेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘शिवसेनेचा अंत जवळ आलाय,’ असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राणे कुटुंबीय सातत्यानं शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, दिशा सालियन आत्महत्या प्रकरण, करोना साथीची परिस्थिती, कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण अशा सर्वच प्रकरणात नीलेश राणे हे ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. विशेषत: मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत.

वाचा:

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरूनही नीलेश राणे यांनी काल शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. नाणार प्रकल्प शिवसेनेलाच हवा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर आज एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचं कात्रण नीलेश राणे यांनी सोशल मीडियात शेअर केलं आहे. ‘शिवसेना उपनेत्याच्या मुलाची मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणी चौकशी’ अशी ही बातमी आहे. या बातमीचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘एकेकाळी शिवसेनेची काय ओळख होती आणि आता काय झाली आहे. बलात्कारी, ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, खून प्रकरण, ही आजच्या शिवसेनेची ओळख झाली आहे. ‘अति तिथे माती…’ अशी एक म्हण मराठीत आहे. शिवसेनेचा अंत जवळ आलाय,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here