‘गेले ६ महिने करोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईनवरून लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही खात्री मला आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा,’ असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वाचा:
करोनाची साथ आल्यापासून मागील सहा महिने एकनाथ शिंदे वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत. राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे खात्याचे मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतानाच लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात सक्रिय आहेत. त्यातून ते अनेकांच्या संपर्कात आले होते. खबरदारी म्हणून त्यांनी बुधवारी ‘कोविड १९’ ची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती बरी आहे. मात्र, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी व स्वत:ची कोविड चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
राज्यातील डझनभराहून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित झाले होते. यामुळे या मंत्र्यांची कार्यालये काही दिवस बंद होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times