प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागणाऱ्या भाग्यवंत लाटे यांच्या वकिलांना न्यायालयानं फटकावरलं होतं. इतर वेळी तुम्ही तत्पर असता आणि जेव्हा उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा मुदत मागता, असं कोर्टानं म्हटलं होतं. त्यावर कंगनानं न्यायालयाचे आभार मानले आहेत. ‘तुमचा हा निर्णय ऐकून मला गहिवरून आलं. मुंबईच्या या मुसळधार पावसात माझं घर कोसळतंय, पण तुम्ही माझ्या घराचा विचार केला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, अशा शब्दात कंगनानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई महापालिकेनं कंगनाच्या बंगल्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हणत नुकसानभरपाईसाठी कंगनानं न्यायालयात धाव घेतली होती. तसंच, संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळं बंगल्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोपही तिनं केला होती. कंगनाच्या या आरोपांनंतर न्यायालयानं संजय राऊतांनी या प्रकरणात प्रतिवादी केलं होतं. त्याचबरोबर तोडकामाची कारवाई करणारे सहाय्यक आयुक्त लाटे यांनाही प्रतिवादी केलं आहे. त्यांच्याकडून न्यायालयाने स्पष्टीकरण मागवलं होतं.
संजय राऊत हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याचं त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात नमूद केलं. त्यामुळं उच्च न्यायालयात त्यांना नंतर प्रथिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागणाऱ्या लाटे यांच्या वकिलांना मात्र न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.
दरम्यान, कंगनानं पाकिस्ताननं पुलवामामध्ये केलेल्या हल्ल्यात जितके जवान शहीद झाले त्यापेक्षा कित्येक निष्पाप नागरिकांचा तुमच्या बेफिकीरीमुळं मृत्यू झालाय, असा धक्कादायक आरोप केला आहे. भिवंडीत दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या वरूनच कंगनानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री
यांच्यावर निशाणा साधला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times