वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क फेज दोन येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून सहाय्यक पोलिस फौजदार शाकिर जिनेडी यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने बोडकेवाडी परिसरात सापळा लावला.
तेव्हा येथील एका कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ योगेश्वर फाटे याला पकडण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या प्लॅस्टिक पोत्यासारख्या पिशवीत ६ लाख ४० हजार १५० रुपयांचा २५ किलो ६०६ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची कबुली दिली आहे. आयटीपार्कमध्ये हा कोणाला गांजा विक्री करणार होता याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. मागील काही दिवसांपासून अचानक शहरात मोठ्या प्रमाणात गांजा सापडू लागला आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार घेतल्यावर अचानक कारवाईचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times