मुंबईः करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत करोना संसर्गाला रोखण्यात यश आलं असतानाच पुन्हा एकदा संसर्ग वाढत असल्याचं समोर आळं आहे. माहिम या परिसरातील करोना रुग्णांची संख्या अजूनही चिंता वाढवणारी आहे. मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज दादरमध्ये ५१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ३८६ इतकी झाली आहे.

दादरमध्ये अद्यापही करोनावर अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाहीये. अद्यापही इथे नवीन रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत ५१ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, आत्तापर्यंत ५४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे २ हजार ७२२ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत ही पुन्हा करोनानं डोकं वर काढलं आहे. धारावीत सध्या ३ हजार १०२ रुग्ण आहेत. तर, आज १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर धारावीत सध्या १९४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. समाधानकारक बाब म्हणजे २ हजार ६२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती पालिका आधिकाऱ्यांनी दिली आहे.

माहिममध्ये आज ४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण करोना रुग्णांचा आकडा ३०८० इतका झाला आहे. तर, सध्या ५४० अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईतील रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४३३ जणांनी करोनावर मात करून सुखरुप घरी परतले आहेत.

धारावी, दादर आणि माहिम हा परिसर जी/उत्तर विभागात येतो. या विभागात आत्तापर्यंत ९ हजार ५६८ करोनाचे रुग्ण आहेत. यामध्ये ७ हजार ७८२ रुग्ण बरे झालेत तर १२८२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here