मुंबई : एकीकडे भांडवली बाजारात जोरदार विक्री सुरु असली तर दुसऱ्याबाजूला प्रारंभिक समभाग विक्री योजनेला (IPO० गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दोन आठवड्यात तिसऱ्या योजनेला १०० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचा ६०० कोटींचा आयपीओ आज गुरुवारी शेवटच्या दिवशी ३.९ पटीने सबस्क्राइब झाला. विशेष म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार १.३७ कोटी शेअर्ससाठी कंपनीकडे ५.४ कोटी शेअर्सचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १८० कोटींचा निधी उभारला होता. त्यामुळे एंजल ब्रोकिंगच्या शेअरची किती रुपयांना नोंदणी होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवाड्यात हॅप्पिएस्ट माइंड टेक्नाॅलाॅजीजचा शेअर दुप्पट भावात सूचीबद्ध झाला होता. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले होते.

शेअर ब्रोकिंग एंजल ब्रोकिंग लिमिटेड (कंपनी) हे भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकिंग हाऊस आहे. कंपनीने २२ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १० रुपये असे दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ (प्रारंभिक समभाग विक्री योजना) खुली केली होती. आज २४ सप्टेंबर २०२० रोजी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये ३०५ ते ३०६ रुपये प्रति समभाग असा निश्चित करण्यात आला आहे. या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये कंपनीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये कंपनीच्या सरासरी ६०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्यात सरासरी ३०० कोटी रूपयांच्या नवीन समभागांचा (फ्रेश इश्यू) समावेश आहे आणि ऑफर फॉर सेल सरासरी ३००० रूपयांपर्यंत आहे. त्यात अशोक डी ठक्कर यांचे सरासरी १८३.३५ दशलक्ष आणि सुनिता मगनानी यांचे सरासरी ४५ दशलक्ष रूपयांपर्यंतच्या समभागंचा (प्रवर्तक विक्री भागधारक) आणि आयएफसीच्या १,२००.०२ दशलक्ष रूपयांपर्यंत (गुंतवणूक विक्री भागधारक) आणि वैयक्तिक विक्री भागधारकांचे १५७१.६३ रूपयांपर्यंत (प्रवर्तक विक्री भागधारक, गुंतवणूक विक्री भागधारक आणि वैयक्तिक विक्री भागधारक मिळून) यांचा समावेश आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here