मुंबई: राज्यात मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. आज आणखी ४५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून राज्यात आतापर्यंत या संसर्गाने ३४ हजार ३४५ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील सध्या २.६८ टक्के इतका आहे. ( )

महाराष्ट्रात गेल्या सात महिन्यांपासून करोनाचा कहर सुरू आहे. करोना साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध उपययोजना राबवल्या जात असल्या तरी अद्याप या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. स्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. नवीन बाधित रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्या आकडेवारीत चढउतार पाहायला मिळत असला तरी करोना मृत्यूंचा आकडा वाढताच असल्याने ते चिंतेचे सर्वात मोठे कारण ठरले आहे. आज एकूण ४५९ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील २५६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, १२५ मृत्यू हे मागील आठवड्यातील तर उर्वरित ७८ मृतयू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात आज १९ हजार १६४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ६१ लाख ९० हजार ३८९ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १२ लाख ८२ हजार ९६३ चाचण्यांचे अहवाल (२०.७२ टक्के ) पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या प्रत्यक्षात २ लाख ७४ हजार ९९३ अॅक्टिव्ह रुग्ण असून सर्वाधिक ६० हजार १४६ अॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यानंतर जिल्ह्यात २९ हजार ७६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर शहर आणि उपनगर जिल्ह्यांत मिळून २७ हजार ७४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यात १७ हजार १८४ रुग्णांनी करोनावर मात केली असून या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ९ लाख ७३ हजार २१४ रुग्ण करोनामुक्त झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ७५.८६ टक्के इतके झाले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here