श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कादरींचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर यांना तातडीने रुग्णालयात नेलं जात होतं. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बाबर कादरी हे जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे तर देशभर परिचित नाव होते. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान ते कायम काश्मिरींची बाजू मांडताना दिसून आले. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत होतं. परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या जीवाला धोका असल्याचं बाबर कादरी यांनी शेवटच्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं.

संस्थांसाठी मोहीम राबवतो, अशा माझ्याविरोधात अफवा पसरवणाऱ्या शाह नजीरविरोधात एफआयआर दाखल करा, अशी राज्य पोलिस प्रशासनाला विनंती आहे. खोट्या वक्तव्यांमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं बाबर कादरी यांनी आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिलंय. कादरी यांचं ट्विटर अकाउंट बाबर कादरी ट्रुथ या नावाने होते.

यापूर्वी गुरुवारी बडगाममध्ये भाजपच्या सरपंचाची हत्या करण्यात आली. ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलरचे (BDC) अध्यक्ष आणि भाजपचे सरपंच भूपिंदर सिंग यांची दलवाश गावात राहत्या घरी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेच्या काही तासानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवरही हल्ला केला. दहशतवाद्यांनी बांदीपोरा येथे तैनात सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला आणि शस्त्रास्त्र घेऊन पळून गेले. गुरुवारी पहाटे हा हल्ला झाला. या हल्ल्यातील जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे नंतर उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सरपंचांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here