वाचा:
बालिवूडमधील अभिनेता आत्महत्या प्रकरणात मार्फत तपास सुरू आहे. या तपासादरम्यान जया सहा हिच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये मिळालेल्या माहितीवरून बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा, अभिनेत्री , अभिनेत्री यांचा समावेश आहे.
याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी सांगितले की, अभिनेता किंवा अभिनेत्रींचे मोबाइलवरील व्हॉट्सअॅप चॅट सक्षम पुरावा ठरणार नाही. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सखोल तपास करावा लागणार आहे. संबंधित अभिनेते किंवा अभिनेत्री या कुणाकडून ड्रग्ज घेत होत्या, ते ड्रग्ज सिंडिकेट्सचे सदस्य होते का, याचा शोध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला घ्यावा लागेल. जर हा कटाचा भाग असेल तर मात्र अभिनेते व अभिनेत्रींच्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅप चॅट सक्षम पुरावा म्हणून त्यांच्याविरोधात वापरता येऊ शकतो.
वाचा:
ड्रग्ज प्रकरणात काही ड्रग्ज पेडलरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आपले जबाब दिले. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांची नावे समोर आली. ज्यांची नावे समोर आली, ते स्वतःसाठी ड्रग्ज घेत होते का, किती प्रमाणात घेत होते, कोणाकडून घेत होते, ड्रग्जचा पुरवठा कोणाकडून व कोठून होत होता, याचा शोध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला घ्यायचा असेल म्हणून अभिनेत्रींना समन्स दिले असावे. अभिनेत्रींच्या चौकशीनंतर या प्रकरणाची पाळेमुळे शोधता येतील. परंतु, अभिनेत्रींना व्हॉट्सअॅप चॅटमुळे शिक्षा होईल का, हे आताच सांगता येणार नाही, असेही अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर बॉलिवूड हादरलं आहे. सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात अनेक मोठी नावे पुढे येऊ लागली आहेत. याप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अटकसत्र सुरू असून दीपिका पदुकोण आणि सारा अली खान या आघाडीच्या अभिनेत्रीही अडचणीत आल्या आहेत. दीपिका व सारा यांची शनिवारी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
पाहा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times