मुंबई: अभिनेता प्रकरणात अमली पदार्थ चौकशीच्या जाळ्यात आणखी काही सिनेतारका येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका जया शाहने दिलेल्या माहितीच्या आधारे नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तपास सुरू केला आहे. या प्रकरणात एनसीबीने समन्स बजावलेली अभिनेत्री आणि यांची उद्या, शनिवारी चौकशी होणार आहे. ( Latest Updates )

वाचा:

सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थांची मात्रा कशी द्यावी, याबाबत व यांचे चॅट संभाषण सीबीआयमार्फत एनसीबीकडे देण्यात आले आहे. त्याआधारे जया शाहची एनसीबीने कसून चौकशी केली. तिने दिलेल्या माहितीनुसारच चार अभिनेत्रींना समन्स बजाविण्यात आले आहे. दरम्यान, दीपिकाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एजन्सीची प्रतिनिधी करिष्मा प्रकाश हिची आज चौकशी होणार आहे.

आणखी काही सिनेतारका, निर्माते रडारवर

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थ संबंधी चौकशीबाबत एनसीबीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती व जया शाह या दोघांनीही दिलेल्या माहितीमध्ये अनेक सिनेतारका व निर्मात्यांची नावे समोर आली आहेत. परंतु त्या सर्वांनाच एकत्रितरित्या समन्स बजावण्यात आलेले नाही. याबाबत एनसीबी आधी अभ्यास करीत आहे. संपूर्ण अभ्यासाअंतीच आवश्यक तसे समन्स बजावले जातील, असे सांगण्यात आले.

वाचा:

दरम्यान, एनसीबीने या प्रकरणात गुरुवारी डिझायनर सिमोन खंबाटा हिची चौकशी केली. सिमोन खंबाटा हीदेखील अभिनेत्रींचे व्यवस्थापन करणाऱ्या एका एजन्सीशीच संबंधित आहे. ज्या चार अभिनेत्रींना समन्स बजाविण्यात आले आहे, त्या चारही अभिनेत्री व जया शहा हे सर्व त्याच एजन्सीशी संबंधित आहेत. त्यामुळे येत्या काळात ही एजन्सी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रकुलप्रीतकडून उत्तर नाही

या प्रकरणात एनसीबीच्या विशेष तपासणी पथकाने अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर व रकुलप्रीत सिंहला समन्स बजावले आहे. रकुतप्रीत सिंह ही सध्या हैदराबाद येथे असून तिथे तिला कुठलेही समन्स मिळालेले नाही, असे तिच्याशी संबंधितांचे म्हणणे आहे. एनसीबीने मात्र तिला फोनद्वारे समन्सची माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here