म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: खाकी वर्दी, डोक्यावरील टोपी आणि हातातील काठी, ही पोलिसांची खास ओळख; यामुळे डयुटीवर असताना हा वर्दी सोबत डोक्यावर टोपी अन काठी सोबत काम करतील असे आदेश यांनी वायरलेस वरून दिले.
गुरूवारी(२४ सप्टेंबर ) सर्व विभागात वायरलेसवर फर्मान सोडत डोक्यात टोपी ठेवणे सक्तीचे केले आहे.

पोलिसांचा गणवेश यापूर्वी अनेकदा बदलला. सुरवातीला असलेली ‘हाफ पँट’ जाऊन आता “फुल पँट’ आली. लाकडी लाठ्या जाऊन आता फायबरच्या नव्या आकर्षक लाठ्या आल्या आहेत. ऐवढेच काय तर पोलिसांची टोपी देखील बदलली आहेत्यामुळे पोलिस कर्मचारी अधिक ‘स्मार्ट’ दिसू लागले. पूर्वी बहुतांश पोलिसांकडे सायकली होत्या. घरूनच गणवेशात निघालेले हे पोलिस सायकलला काठी लटकवून जायचे. ड्युटीवर असतानाही डोक्यावर टोपी आणि हातातील काठी कायम असायची. गणवेशाशिवाय वरिष्ठांसमोर जाणे दूरच; ठाण्याच्या आवारात पाय ठेवण्याचीही हिंमत कोणी करीत नव्हते. आता मात्र पूर्ण गणवेश केलेले पोलीस अभावानेच पाहायला मिळतात. तेव्हाचे वरिष्ठ अधिकारीही याबद्दल कडक शिस्तीचे असत. त्यानंतर मोटारसायकली आल्या, तरीही पोलिसांची काठी सोबत होतीच. दुचाकीला काठी लटकविण्यासाठी त्यांनी खास सोय करवून घेतलेली होती. काठी लटकविलेली दुचाकी म्हणजे पोलिसांची, अशी खास ओळखही त्यांची झाली होती.

पोलिस दलात नव्याने भरती झालेल्यांना मात्र हा गणवेश फारसा रुचलेला दिसत नाही. डोक्यावर टोपी आणि हातात काठी, असे पोलीस तर मोठ्या बंदोबस्ताशिवाय इतरत्र दिसतच नाहीत. कामावर जाताना अगर परतताना खाकी वर्दीवर साधा शर्ट घालून जातात. कामावर असतानाही टोपी खिशात ठेवून देतात. औरंगाबाद शहरातील पोलिसांचे हे चित्र पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांना अनेकदा खटकले़ त्यांनी शहरातील अनेक पोलिस ठाण्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली असता त्यात पोलिसांच्या डोक्यावर टोपी नसल्याचे नजरी पडले़ ही बाब खटकल्याने गुप्ता यांनी तातडीने नियंत्रण कक्षात वायरलेसवर आदेश प्रसारीत करत सर्वांना या पुढे कर्तव्यावर असतांना डोक्यात टोपी सक्तीची राहणार असल्याचे सांगीतले.

टोपी म्हणजे सन्मान

पोलिस आयुक्तांनी वायरलेसवर संदेश देतांना सांगीतले की, पोलिसांची टोपी म्हणजे रुबाब, डोक्यात टोपी असल्यावर आणि आंगात खाकी वर्दी असल्यास लोक सन्मान करतात़ शिवय वर्दीत असतांना टोपी नसली तर तो होमगार्ड आहे, जमादार आहे की पोलिस निरीक्षक आहे. हे देखील समजत नाही़ त्यामुळे टोपी डोक्यात असू द्या़ असे ही आयुक्तांनी सांगीतले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here