पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज पुन्हा एकदा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना धक्का देत सकाळी सहा वाजता स्टेशनात जाऊन मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणी केली. पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील कामांचा त्यांनी आढावा घेतला. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
वाचा:
पुणे स्थानक, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे अजितदादांनी पाहणी केली. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.
वाचा:
शिवाजीनगर येथे अजित पवारांनी मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथील बोगदा काम, व्हील पार्क (वानज) येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तेथील कामाचीही त्यांनी पाहणी केली. ‘मेट्रो’च्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times