वाचा:
‘सुशांतसिंह प्रकरणाबाबतची चर्चा ही आता दुसरीकडे भरकटली आहे. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी योग्य तपास करण्याचा प्रयत्न केला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले आहे. मात्र या प्रकरणावरून दुर्दैवाने राजकारण होताना दिसते. मुळात सर्वांनी एकत्र येऊन करोना मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करणे गरजेचे होते. पण तसं होत नाही व विरोधक लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा घणाघातही त्यांनी केला.
…म्हणून आज भारत बंद
कृषी विधेयकाला विरोध म्हणून आज भारत बंदची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. याबाबत ही मंत्री गडाख यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘कृषी विधयक बळजबरीने राज्यसभेत व लोकसभेत मंजूर करून केंद्र सरकारने घेतले. या विधेयकाची चर्चा झाली नाही. शेतकर्यांचे जे प्रश्न होते त्याचे उत्तर न देता बळजबरीने हे विधेयक केंद्र सरकारने मंजूर करून घेतले. आजचा भारत बंद हा त्यालाच विरोध दिसत आहे.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times