अहमदनगर: पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज माजी मंत्री प्रा. यांनी बोलणे टाळले. शिंदे यांचा घसा दुखत असल्यामुळे ते बोलणार नसल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर मात्र माजी मंत्री यांनी हाच धागा पकडत आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. ‘शिंदे यांचा घसा दुखतोय म्हणून ते बोलणार नाहीत, असे जेव्हा सांगितले तेव्हा मी घाबरलोच. कारण करोनाचे एक लक्षण घसा दुखणे आहे,’ असे ते म्हणाले आणि एकच हास्यकल्लोळ झाला.

वाचा:

नगरमध्ये सावेडी येथे आज शहर भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रा.राम शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, अभय आगरकर आदी उपस्थित होते.

वाचा:

प्रा. राम शिंदे यांना हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सूत्रसंचालकाने बोलण्यासाठी आमंत्रित केले. मात्र, शिंदे यांच्याऐवजी गंधे यांनीच उभे राहून सांगितले की, ‘शिंदे साहेबांचा घसा दुखत असल्यामुळे ते बोलणार नाहीत.’ जेव्हा तावडे हे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम यावरच भाष्य केले. ते म्हणाले, ‘जेव्हा भैय्या गंधे म्हणाले की शिंदे हे घसा दुखत असल्यामुळे बोलणार नाही, तेव्हा मी घाबरलो. कारण करोनाचे एक लक्षण घसा दुखणे आहे. मी त्यांना लगेच विचारले, काय रे बाबा काय झाले, त्यावर रामभाऊ म्हणाले, संघचालक बोलल्यानंतर दुसरे कोणी बोलू नये, त्यामुळे मी बोललो नाही. त्यानंतर मात्र मी निर्धास्त झालो. नाहीतर जाताजाता कुठेतरी रुबी हॉल किंवा मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मला जावे लागले असते. आता सध्या दिवसच असे आहेत. लहानपणी जेव्हा आपल्याला सांगायचे हात धुवून जेवायला बसा, तेव्हा कोणी ऐकत नव्हते. स्वच्छता पाळा म्हटलं तर कोणी पाळत नव्हते. पण आता देवानेच आपल्याला शिकवले की या गोष्टी नीट करा.’

प्रांत संघचालकांचे मानले आभार

शहर भाजपच्या कार्यक्रमाला प्रांत संघचालक नानासाहेब जाधव उपस्थित राहिल्याने त्यांचे माजी मंत्री विनोद तावडे यांनी विशेष आभार मानले. ते म्हणाले, ‘भाजपच्या मंचावर कोणतेही संघचालक येत नाहीत. पण दीनदयाळ यांची आज जयंती आहे, व त्यांच्या एकात्म, मानवता या विचारांच्या मार्गाने संघ परिवार जातो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला नानासाहेब आले, याचा मनापासून आमच्या सर्वांनाच आनंद झाला आहे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here