मुंबई: भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री यांनी आज केलं. मात्र, वरिष्ठांकडून सूचना येताच तासाभरातच त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं. या घटनाक्रमामुळं वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक. आज त्यांची जयंती. भाजपच्या सर्व नेत्यांनी आज ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मात्र, चर्चा झाली ती अजित पवार यांनी केलेल्या आणि नंतर डिलिट केलेल्या ट्वीटची.

वाचा:

‘भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असं ट्वीट अजित पवारांनी सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य कुठल्याही नेत्यानं असं ट्वीट केलं नव्हतं. मात्र, अजितदादांनी ते केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. अजित पवार भाजपला ‘मेसेज’ देऊ पाहत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या ट्वीटरवर तशा प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या. हे सगळं सुरू असतानाच तासाभरात अजित पवारांच्या ट्विटर हँडलवरून हे ट्वीट गायब झालं. त्यामुळं पुन्हा चर्चा सुरू झाली. अखेर अजितदादांनीच वृत्तवाहिन्यांशी बोलताना याबाबत खुलासा केला. ‘हयात नसलेल्या व्यक्तींबाबत चांगलं बोलणं ही आपली संस्कृती व परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं, इतर गोष्टीही असतात,’ असं ते म्हणाले.

कुणाच्या ध्यानीमनी नसताना भाजपशी संधान साधून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार यांच्या प्रत्येक कृतीकडे राजकीय वर्तुळाचे, विशेषत: राष्ट्रवादीचे लक्ष असते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अजितदादांनी मांडलेली भूमिकाही अशीच चर्चेचा विषय ठरली होती. अजितदादांचे चिरंजीव पार्थ यांनीही काही दिवसांपूर्वी पक्षाच्या भूमिकेविरोधात एकमागोमाग एक ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती.

वाचा:

मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here