वाचा:
एनसीबी ही राष्ट्रीय तपास संस्था आहे. या संस्थेचं काम राष्ट्रीय पातळीवर चालतं. परदेशातून आपल्या देशात ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असता. हे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करायचे, त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करायचा, हे खरेतर एनसीबीचे काम आहे. मात्र सध्या एनसीबीच्या कार्यालयात एकेकाला बोलवून चौकशी करण्याचे काम केले जात आहे. हे काम करण्यासाठी प्रत्येक शहर आणि राज्यात पोलीस दलामध्ये एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आलेला असतानाही एनसीबी स्वत:हून स्थानिक पातळीवर तपास करत आहे. त्याला आमची कोणतीच हरकत नसून सुशांत प्रकरणात सीबीआयच्या तपासाचे काय झाले ते सांगा?, असा खरमरीत सवाल राऊत यांनी विचारला.
वाचा:
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र सीबीआयच्या हाती काहीच लागले नाही त्यामुळे मार्फत तपास सुरू करण्यात आली आहे. हे सगळं करत असतानाच सुशांत आत्महत्या प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहचला हेसुद्धा कळलं पाहिजे, असे राऊत यांनी पुढे नमूद केले.
मुंबई झळाळतच राहणार
फिल्मसिटी उत्तर प्रदेशात हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याबद्दल विचारले असता, फिल्मसिटी उत्तर प्रदेशात गेल्यास मुंबईचे वलय अजिबात कमी होणार नाही, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण विदेशात होत असते. त्यासाठी सतत कलाकार परदेशात असतात. मात्र त्याने मुंबईचे महत्त्व कमी झाले नाही आणि होणार नाही. मुंबई नेहमीच झळाळत राहणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. मुंबई पालिका ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे पालिकेने कंगना राणावतच्या कार्यालयावर कारवाई केली असेल तर त्याच्याशी माझा काय संबंध?, असा प्रतिसवाल राऊत यांनी एका प्रश्नावर विचारला. कंगना प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही तरीही मी कोर्टात भूमिका मांडणार आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times